शिवसेनेच्या १३ जागा भाजपने गटवल्या
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेची युती तुटली आणि कोणं किती जागा निवडून आणतंय याची उत्सुकता वाढली. त्यातल्या त्यात कोण कुणाच्या किती जागांवर डल्ला मारणार हा देखिल उत्सुकतेचा विषय होता.
राज्य सरकारमध्ये मुंबईला मिळणार झुकते माप
राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे बहुमतात सरकार आले नाही. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करीत आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेनेवर दबावतंत्र अवलंबिल्याचे धोरण सुरु आहे. जर सेनेचा पाठिंबा मिळाला नाहीतर अल्पमतात सरकार बनवायचे आणि मुंबईला जास्तीत जास्त मंत्रिपदे देण्याची व्युहरचना करण्यात येत आहे.
ऐन दिवाळीत मनसेत 'फटाके'!
ऐन दिवाळीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फटाके फुटायला सुरूवात झालीय.
सेना कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या, शिवसैनिकांचा उद्रेक
आज मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडलाय. मुंबईत भरदिवसा एका राजकीय नेत्याची त्याच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आलीय.
मी दिल्लीत आनंदी आहे, पण... : नितीन गडकरी
मी दिल्लीमध्ये खूश आहे, पण पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेतील तो मान्य असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुतोवाच करून आपण मुख्यमंत्री होण्यास तयार आहे असे स्पष्ट संकेत दिले आहे.
शक्तीप्रदर्शन... गडकरींच्या निवासस्थानी जमले भाजपचे 40 आमदार!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता विदर्भातले आमदार सरसावले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरींनीच मुख्यमंत्री होण्याची मागणी केल्यानंतर विदर्भातल्या आमदारांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिलाय.
'हातात नाही आमदारकीचा 'पत्ता', तरीही मी नेता'
भाजपसोबत विधानसभा निवडणुकीत असलेल्या घटकपक्षांची वाट लागली आहे, आरपीआयचा एक उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही, तरीही आम्हाला दोन मंत्रीपदं द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
मोदी मॅजिक... विदर्भात काँग्रेस आऊट!
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसचं या निवडणुकीत पूर्णपणे पानिपत झालंय. भाजपनं यंदा दुप्पटीपेक्षा जास्त जिंकल्यात...
शिवसेना भाजपला पाठिंबा देणार
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कामध्ये शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर सरकार स्थापनेच्या घटनेने अनपेक्षीत वळण घेतले आहे.
अखेर, शिवसेनेची ४८ वर्षांची प्रतिक्षा संपली!
कोकण... शिवसेनेचा बालेकिल्ला... पण, या बालेकिल्ल्यात रत्नागिरी विधानसभेच्या जागेवरून सेनेचा पहिला आमदार निवडून जाण्यासाठी शिवसेनेच्या स्थापनेपासून (१९६६) आत्तापर्यंत प्रतीक्षा करावी लागलीय.
मुनगंटीवारांना देवेंद्र नको, गडकरी हवेत... मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी मुख्यमंत्रीपदासाटी भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारण मात्र सुरु झालंय.
शहरातील मतदारांचा भाजपला कौल
राज्यातला शहरी मतदार बहुतांश प्रमाणात भाजपाच्या बाजुनं असल्याचं या निकालामधून समोर आलंय.. शहरी भागात मोडणा-या 92 जागांपैकी तब्बल 52 जागा भाजपानं पटकावल्यात... यात मुंबई आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला...
खट्टर यांच्याशी संबंधित आठ महत्वाचे मुद्दे
मनोहर लाल खट्टर हे हरियाणात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री असतील, खट्टर हे पंजाबी आहेत. पंजाबी समाजातील ते हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री आहेत.
खट्टर यांची हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी निवड
हरियाणात भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर पक्षाने मनोहर लाल खट्टर यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. खट्टर हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होतील.
१९९५ च्या विधानसभा जागांची स्थिती
भाजप-शिवसेनेचे १९९५ मध्ये सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळीची स्थिती काय होती. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा होत्या. हे आज आपल्या आठवत नाही. या जागांच्या आधारावर शिवसेेनेचा मुख्यमंत्री करण्यात आला होता.
भाजपचा गेमप्लॅन, सेनेला सत्तेपासून दूर ठेवणार!
भाजपचा गेमप्लॅन तयार केला आहे. राष्ट्रवादीचे समर्थन घेऊन सरकार स्थापन करण्यावर भर दिला आहे. एकदा का सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार फोडून राज्यात स्थिर सरकार स्थापण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचवेळी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्नही असणार आहे.
12 वेळेस विजयी झालेले 94 वर्षाचे आमदार
महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार गणपतराव देशमुख आहेत, गणपतराव देशमुख 94 वर्षांचे आहेत. गणपतराव देशमुख यांनी बाराव्या वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली आहे.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामागे 'ती फाईल' तर नाही ना!
भाजपने राज्यात चांगले प्रदर्शन केले आणि १२२ जागा पटकावल्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने भाजपला दुसऱ्या पक्षांवर अबलंबून राहावे लागणार आहे. निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीने सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला तात्काळ पाठिंबा जाहीर केला. मात्र, या पाठिंब्यामागे ती फाईल तर नाही ना, अशी चर्चा आहे.
कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
केंद्रीय गृह मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे रविवारी महत्वाची बैठक घेण्यासाठी मुंबईत येणार होते, मात्र मध्येच राजनाथ सिंह यांनी आपला दौरा रद्द केला.
भाजप नेते भेटलेत, आदेश राज यांचाच असणार - मनसे आमदार
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षातील कोणते आमदार गळाला लागतात याची चाचपणी सुरु झाली आहे. याचाच एकभाग म्हणून मनसेचा एकच आमदार निवडून आला. या आमदाराला गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला. मात्र, आपण पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश मानणार आहोत. मी मनसेत राहणार असल्याचे मनसे आमदार शरद सोनावणे यांनी स्पष्ट केलेय.