शरद पवारांवर 'सामना'त शेलक्या शब्दात टीका
कालपर्यंत भाजप हा तद्दन जातीयवादी व हाफचड्डीवाल्यांचा पक्ष होता आणि या हाफचड्डीवाल्यांची मनसोक्त खिल्ली शरद पवार यांनी प्रचारात उडवली, त्या हाफचड्डीच्या प्रेमात पटेल पडले. म्हणजे पवार-पटेलांनी बाजारातून नवी हाफचड्डी विकत आणली की स्वत:च्या फुल पॅण्टीला कैची मारून त्याची हाफचड्डी केली?, अशा शेलक्या शब्दात टीका 'सामना'तून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आली आहे.
राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची तंबी
महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या हातात सत्ता द्या. सत्तेत आल्यानंतर केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या देऊ, परप्रांतीयांना एकही नोकरी देणार नाही, एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात येऊ देणार नाही, असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठेवला आहे.
शिवसेनेचा प्रस्ताव भाजपनं फेटाळला
राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपकडून बहुमताची जुळवाजुळव सुरू झालीय. शिवसेनेकडून भाजपला गेलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळला आहे.
मनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे.
'भ्रष्टाचारवादी' की 'हफ्ता वसुली' करणाऱ्यांची साथ?
सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला साथीदाराची गरज आहे, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत जी चिखलफेक झाली त्याची आठवण आता विरोधक करून देत आहेत. दुसरीकडे भाजपाच्या जवळ शिवसेना येईलच, याची शाश्वती अजून तरी कुणी दिलेली नाही, मात्र भाजपातील अनेक नेते शिवसेनेसोबत युती होईल, अशी शक्यता गृहीत धरून आहेत, थोडक्यात सत्तेची चावी शिवसेनेकडे आहे.
भाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा डॉन!
राजकारणाच्या गुन्हेगारीबद्दल सातत्यानं ओरड करणाऱ्या भाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा एकेकाळचा मकोका डॉन संतोष आंबेकर सहभागी झाला होता. रविवारी मतमोजणी झाल्यानंतर पक्षाच्या नाव नियुक्त आमदारांच्या विजय
चार दिवसांपासून जगण्यासाठी लढणाऱ्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू
येवलातील अपेक्षित उमेदवाराला मतदान केलं नाही हा राग मनात ठेवून पेटवून दिलेल्या महिलेचा मृत्यू अखेर मृत्यू झालाय. जिजाबाई वाबळे असं त्या महिलेचं नाव आहे. त्या ६५ टक्के भाजल्या होत्या.
स्फोट... स्फोट... आणि स्फोटच पवारांचे साखळी स्फोट
महाराष्ट्रात सत्तेचं गणित भाजप कसं जुळवणार, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यातच शरद पवारांनी एकापाठोपाठ एक 'स्फोट' करण्याचा धडाकाच लावलाय. काय सुरूय, महाराष्ट्राच्या राजकारणात? पाहूयात हा खास रिपोर्ट...
भाजप-सेनेच्या नगरसेवकांची दिवाळी, नऊ नगरसेवक आमदार!
विधानसभा निवडणूक अनेक अर्थानं ऐतिहासिक ठरलीये. ही निवडणूक जशी बहुरंगी, प्रस्थापितांना धक्के देणारी ठरली तशीच नव्याना संधी देणारीही होती. नाशिकमध्ये चार नगरसेवक आमदार झालेत. तर मुंबईतलेही पाच नगरसेवक आता विधानसभेत गेले आहेत.
सोशल नेटवर्किंगवर 'ब्लू प्रिन्ट विकणे आहे'
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हातात अवघी एक जागा लागल्याने, सोशल मीडियावर मनसेची खिल्ली उडवली जात आहे.ब्लू प्रिन्ट विकणे आहे अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या फिरतायत. राज ठाकरे यांनी पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या, सभांनाही खूप प्रतिसाद मिळाला होता.
एमआयएमच्या रुपाने कडव्या मुस्लिमवादाचा महाराष्ट्रात चंचू प्रवेश
हैदराबादः कट्टर 'एमआयएम' संघटनेच्या रुपाने महाराष्ट्रात कडवा मुस्लिमवादाचा चंचू प्रवेश झाला आहे. औरंगाबाद आणि भायखळा येथे मुस्लीम जनतेने येथील दोन उमेदवारांना निवडून विधानसभेवर पाठविले आहे.
पवारांची ही गुगली चालणार नाही – संजय राऊत
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार बनवावे, असा काँग्रेसने प्रस्ताव दिला दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर ही अफवा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचा असा कोणताही प्रस्ताव नाही : माणिकराव
शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसने कुठलाही प्रस्ताव दिला नसल्याचं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेला सरकारपासून दूर ठेवण्याची भूमिका काँग्रेसची असल्याचं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मोदींच्या सभेनंतर १७ भाजप उमेदवार विजयी, १३ पराभूत
शिवसेना-भाजप महायुतीच्या ब्रेकअपपूर्वी महाराष्ट्रासाठी केवळ सहाच सभा पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं होतं. पण ‘महायुती’ फुटल्यानंतर त्यांनी राज्यात तब्बल २७ सभा घेत भाजपच्या जवळपास १७० उमेदवारांसाठी आपल्या पंतप्रधानपदाची सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
शिवसेना+काँग्रेस+राष्ट्रवादीचं सरकारविषयी अजितदादा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी, शिवसेनेला सोबत नेऊन सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
भाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.
शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारण हादरलं
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी, शिवसेनेला सोबत नेऊन सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
भाजपला पाठिंबा देण्याची शिवसेनेची तयारी?
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्यास शिवसेना तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शिवसेना भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार आहे.
प्रीतम मुंडे यांच्याकडून नरेंद्र मोदींचा रेकॉर्ड ब्रेक
गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि बीड लोकसभेच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना ६ लाख ९२ हजार मतं मिळाली आहेत. हा लोकसभेतील एक मोठा विक्रम मानला जात आहे. प्रीतम मुंडे यांनी नरेंद्र मोदी यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रीतम मुंडे यांनी लढवलेली लोकसभेची ही पहिलीच निवडणूक होती.
हरयाणात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचं पानिपत!
महाराष्ट्रासोबतच आज हरयाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. इथं भाजपचा भगवा फडकण्याची चिन्हं आहेत. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांपैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी असून भाजपला पूर्ण बहुमत मिळालंय. देशातील सत्ता गमावल्यामुळं राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसला हा जबरदस्त मोठा धक्का मानला जात आहे.