शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम ‘फ्री’मध्ये उपलब्ध
राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम हे फ्रीमध्ये मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित
भाजपचे उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ३१ ऑक्टोबरच्या शपथविधीनंतर औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय.
देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतरही बँकेतच नोकरी करणार अमृता फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ३१ ऑक्टोबरला शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आपली अॅक्सिस बँकेतील नोकरी कायम ठेवणार आहे. नागपूरहून त्या मुंबईला ट्रान्सफर मागणार आहेत.
दिल्लीत निवडणुका लागण्याची शक्यता
दिल्लीत सद्यस्थितीत कोणताच पक्ष सत्तास्थापन करू शकत नसेल, तर तिथे नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
'दिविजा'नं मोडला शरद पवारांच्या कन्येचा रेकॉर्ड!
भाजप नेते देवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातीत घेऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. ४४ वर्षीय फडणवीस महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
लॉबिंग सुरु… असं असेल ‘फडणवीस’ मंत्रिमंडळ?
३१ तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह १२ मंत्र्यांना शपथ दिली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे... हा सोहळा दिवसांवर आला असताना मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार याबाबत अनिश्चिता आहे.
कट्टर शिवसैनिकाला ८०० चप्पल जोड भेट
बाळासाहेबांचा शिवसैनिक किती कट्टर असतो, किती मनापासून काम करतो याचं उदाहरण आहेत अरविंद भोसले. शिवसेना नेते अरविंद भोसले यांनी तब्बल नऊ वर्षानंतर पायात चप्पल घातलीय, नारायण राणे हे शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये गेले होते, आता नारायण राणे यांचा शिवसेनेकडून पराभव झाल्यानंतर अरविंद भोसले यांनी चप्पल घातलीय.
पारदर्शी आणि राज्याला विकासाकडे नेणारं सरकार देऊ - फडणवीस
आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली. त्यानंतर देवेंद्र आणि त्यांच्या कोअर कमिटीनं राज्यपालांकडे सरकार बनविण्याचा प्रस्ताव सादर केला.
पाहा कोण आहेत देवेंद्र फडणवीस?
‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळं मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असं आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलानं आईला बजावून सांगितलं. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावं लागलं. संघ, जनसंघाच्या संस्कारांचं बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्याचं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा आज प्रत्यक्षात अवतरली आहे.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!
स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषणवणारे फडवणीस हे विदर्भातील चौथे नेते आहेत.
सहा नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करणार?
मुंबईत भाजपची सत्ता स्थापन करण्याची तयारी दिसून येत आहे. राजनाथ सिंह मुंबईत दाखल झाले आहेत, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित असल्याचं सांगण्यात येतंय.
'मी शर्यतीत', नाथाभाऊंचा मुख्यमंत्रीपदावर दावा
मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस याचं नाव जवळ-जवळ निश्चित झालं असल्याचं सांगितलं जातंय, अशा वेळी एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्यानंतर पक्षाची अडचण होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेनं मागितलेले ६ महत्त्वाची खाती देण्यास भाजपचा नकार – सूत्र
शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत भाजपनंच आता काही अटी आणि शर्ती लागू केल्याचं समजतंय. शिवसेनेनं मागितलेली ६ प्रमुख खाती देण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिलाय.
शिवसेनेच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली?
भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे भाजपने शिवसेनेला कोणतंही उत्तर दिलं नसल्याने शिवसेनेतील अस्वस्थता वाढलीय.
नवनिर्वाचीत भाजपा आमदाराचं निधन
मुखेडचे भाजपचे नवनिर्वाचीत आमदार गोविंद राठोड यांचं निधन झालंय. देवगिरी एक्स्प्रेसने नांदेडहून मुंबईला येतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गोविंद राठोड यांना उपचारासाठी जालन्यातील रूग्णालयात दाखल केलं पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवसेना पुन्हा बॅकफूटवर?
शिवसेनेने आपलं मुखपत्र सामनामध्ये म्हटलंय, राज्याच्या भल्यासाठी भाजपाने ठरवलेल्या व्यक्तीला आपण मुख्यमंत्री म्हणून साथ देण्यास तयार आहोत.
'बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास राष्ट्रवादी अनुपस्थित'
राज्याच्या राजकीय पटलावर ज्यांची चाल सर्वात महत्वाची समजली जाते, त्या शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला साथ देण्याचे संकेत दिले आहेत. भाजपवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ राष्ट्रवादी सभागृहात तटस्थ राहणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांची वाणी किती बदललीय?
प्रचारात मोदी सरकारवर सडकून टीका करणाऱ्या शरद पवारांची निकाल हाती आल्यावर वाणीच बदलून गेलीय. आधी भाजपला बिनशर्त पाठींबा देऊ करणाऱ्या पवारांनी आता मोदी सरकारचं कौतुक करायला सुरूवात केलीय.
मोदींच्या स्नेहभोजनाला काही सेना खासदारांची दांडी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांसाठी दिवाळीनिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. दिवाळी मिलन नावाचा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या स्नेहभोजनाचं निमंत्रण एनडीएच्या सर्व घटकपक्षांना पाठवण्यात आलंय.
मोदी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला उद्धव अनुपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतल्या रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलचं उदघाटन झालं. नव्वद वर्ष जुन्या असलेल्या हॉस्पिटलची रिलायन्सकडून नव्यानं उभारणी करण्यात आली.