school

आराध्या बच्चनसुद्धा जाणार शाळेत...

आराध्याच्या जन्मानंतर मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा आनंद जणू काही गगनात मावेनासाच झालेला आहे. आराध्या या वर्षी नोव्हेंबरला २ वर्षांची होणार असून ऐश्वर्या, अभिषेक तसेच आजोबा अमिताभ बच्चन तिच्या शाळेच्या तयारीला लागले आहेत. तिच्यासाठी सर्वात चांगल्या अशा प्लेग्रुपच्या शोधात बच्चन कुटुंबिय लागले आहेत. शेवटी काय तर बच्चन कुटुंबियाची सर्वात लाडकी नात असल्याने हे तर होणारच.

Jun 28, 2013, 06:25 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचे स्वागत

पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी सुखद आश्चर्याचा धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत के्लं.

Jun 17, 2013, 03:24 PM IST

शाळेचा आज पहिला दिवस, कोण कोण भेटणार?

उन्हाळी सुट्टीनंतर राज्यभरातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. त्यातच दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर शाळांमध्ये प्रथमच येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी सरकारने फूल देऊन स्वागत करण्याच्या सूचना केल्यात. तर काही शाळांत शालेय पोषण आहारात मिष्टान्नाचा बेत आखण्यात आला आहे.

Jun 17, 2013, 07:35 AM IST

बिलाबाँग शाळेच्या बसची मनसेने केली तोडफोड

ठाण्यातल्या बिलाबाँग शाळेच्या बसची मनसैनिकांनी तोडफोड केली आहे. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. मनसेनं शाळेवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे.

Jun 1, 2013, 02:53 PM IST

आश्रमशाळांमध्ये १९२ विद्यार्थ्यांचा मृत्यू

राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या 192 विद्यार्थ्यांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब उघडकीस झाली.

May 8, 2013, 04:54 PM IST

रत्नागिरीत विद्यार्थींनीचा बलात्कार करून खून

रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एका शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Mar 28, 2013, 04:16 PM IST

पाचवीतल्या मुलीची आत्महत्या, अधीक्षकाला अटक

उल्हासनगरमधल्या राजर्षी छत्रपति शाहू महाराज या मागासवर्गीय वस्ती शाळेच्या अधीक्षकाला अटक केली आहे. शाळेतल्या पाचवीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिक्षकाला अटक केली.

Mar 21, 2013, 08:43 PM IST

विद्यार्थ्यांना संडास धुवायला लावले

शिक्षा म्हणून संडास धुवायला लावल्याने एका शिक्षिकेविरोधात नाराजी व्यक्त होत होती. विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याप्रकरणी दादरमधल्या द एन्टोनिओ डीसिल्वा शाळेतल्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आलंय.

Mar 18, 2013, 02:40 PM IST

चिमुरडीचा ‘बलात्कार नव्हे विनयभंग’

मुंबईत जुहूमध्ये एका स्कूलबसमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालेला नाही तर तिचा विनयभंग झालाय, असं स्पष्टीकरण पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिलं आहे.

Jan 19, 2013, 01:42 PM IST

जुहूत तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार...

मुंबईतल्या जुहूमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. शाळेतून घरी ने-आण करणाऱ्या स्कूलबसमधल्या क्लिनरनंच हे घृणास्पद कृत्यं केल्याचं समोर येतंय.

Jan 19, 2013, 11:47 AM IST

निळ्या बसचा मोफत प्रवास

ग्रामीण भागात एस.टी. च्या बसला लाल डब्बा असंही म्हटलं जातं. मात्र आता नाशिकसह राज्यातल्या १२५ तालुक्यात 'मानव विकास योजने' अंर्तगत मुलींना शिक्षणाकडे आर्कषित करण्यासाठी निळ्या रंगाच्या बसची मोफत सेवा सुरू करण्यात आलीये.

Jul 15, 2012, 02:46 PM IST

शाळा सोडू नये म्हणून मुलांना 'मिरचीची धुरी'

कोल्हापूर जिल्ह्यातील एका निवासी शाळेत शिकणाऱ्या दोन भावंडांना मिरच्यांची धुरी देऊन, काठीने अमानुष मारहाण करण्यात आली. शाळेतील असुविधांमुळे शिकणे अवघड झाल्याने ही मुलं पुन्हा आपल्या गावी निघाली होती.

Jun 26, 2012, 12:02 AM IST

काविळीचे थैमान, इचलकरंजीत शाळा बंद

इचलकरंजीत काविळीच्या साथीनं थैमान घातले आहे. उपमुख्याधिकारी ए.वाय.चव्हाण यांचा काविळीने मृत्यू झाल्यानं प्रशासन खडबडून जागं झाले आहे. त्यामुळे शाळाबंद ठेवण्यात येणार आहेत.

Jun 14, 2012, 12:44 PM IST

पालिकेच्या शाळा का पडतायेत बंद?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या तब्बल १० शाळा बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. विद्यार्थी येत नसल्याची खंत एकीकडे पालिका अधिकारी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे वर्ष उलटलं तरी विद्यार्थ्याना साधे गणवेशही मिळाले नाहीत.

Jun 3, 2012, 06:57 PM IST

शाळेचा 'पहिला तास पाणी भरण्याचा'....

सातारा जिल्ह्यात माण खटाव तालुक्यात दुष्काळानं लहान मुलंही होरपळत आहेत. सकाळी उठल्यावर मुलांचा पहिला धडा असतो तो पाणी भरण्याचा. याचा परिणाम अभ्यासाबरोबरच आरोग्यावरही होतोय. जीव कासावीस करणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातल्या मुलांचं वास्तव आहे.

Apr 20, 2012, 12:27 PM IST